शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : रविवार, 27 फेब्रुवारी 2022 (10:58 IST)

मनसेने अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे वर मोठी जबादारी टाकत मोठी घोषणा केली. राज ठाकरे यांनी चिरंजीव अमित ठाकरे यांची  महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या पासून हे पद रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात होती. आज मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी अमित ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्त केले.त्या संदर्भात मनसेने अधिकृत पत्रक काढले असून त्यात ''आज मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले आहे."
आता अमित ठाकरे यांचावर तरुण आणि विद्यार्थी वर्गाच्या नेतृत्वाची जबादारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना दिलेली ही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.