पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी कशी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची मागणी
ब्रिटिश इतिहास संशोधक जेम्स लेनने आपल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व राजमाता जिजाऊ यांच्याबाबत जे निराधार आरोप केले आहेत ते आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे प्रकाशक व लेखकांनी ते पुस्तक मागे घ्यावे अशा मागणीचे पत्र इतिहासतज्ज्ञ बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह सहा मान्यवरांनी 2003 ला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला दिले होते. हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित नव्हते का? असा सवाल करतानाच पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी केली.