मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (10:50 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली

raj thackeray
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ते येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र त्यांनी हा दौरा स्थगित केला असून त्याची माहिती ट्विट करून दिली. अयोध्येचा दौरा स्थगित केला, यावर सविस्तर माहिती पुण्यात रविवारी होणाऱ्या सभेत बोलू असे ट्विट केले आहे.

मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु केली होती. अनेक शहरांमधून अयोध्या जाण्यासाठी रेल्वेच्या बोग्यांची बुकींग करण्यात आले होते. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते जाणार होते. मात्र  भाजपचे खासदार बृज भूषण यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांचा अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच काही साधू संत यांनीही या दौऱ्यास विरोध आहे. बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनीही या दौऱ्यालाही विरोध केला होता.
 
राज ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण देत हा दौरा स्थगित झाला असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मात्र, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता मात्र राज ठाकरे रविवारी पुण्यात काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.