शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 17 मे 2023 (11:20 IST)

Monsoon Update : यंदाचा पाऊस कधीपासून येणार? हवामान खात्यानं सांगितले

monsoon
राज्यात अवकाळी पावसानंतर मे पाहिल्यात चांगलाच उकाडा जाणवत आहे. तापमान 40 अंशावर आहे.तर खान्देश आणि विदर्भात तापमान 44 अंशाच्या पुढे असून नागरिकांना हिट चा तडाखा बसत आहे.  उकाड्या पासून वाचण्यासाठी यंदा पाऊस कधीपासून येणार हे वेध नागरिकांना लागले असून यंदाच्या पावसाबाबत हवामान खात्यानं अंदाज वर्तविला आहे. 
 
यंदाचे मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच यंदाच्या वर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यंदा 10 किंवा 11 जून ला मान्सूनचे आगमन होणार अशी माहिती मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली. 
यंदा सरासरी 96 टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पावसाचा पुढील प्रवास कसा असेल याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार आहे.राज्यात यंदा 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज वर्तवला आहे.मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा पुन्हा अपडेट येणार आहे, त्यावेळी अधिक चित्र अधिक स्पष्ट होईल.Edited by - Priya Dixit