मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)

नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही - सुषमा अंधारे

sushma andhare
निवडणुकांच्या तोंडावर राजकारणी कधी कोणता विषय घेऊन पुढे येतील याचा अंदाज हवामान खात्यालाही लावणं कठीण आहे. कारण, गुजरात निवडणुकांच्या दौऱ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो लावावा अशी मागणी केल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरु झाली आहे.
 
भाजपाचे आमदार राम कदम यांनीही एक फोटो ट्विट केला असून त्यामध्ये ४ नोटांचे फोटो आहेत. एका फोटोवर छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या फोटोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या फोटोवर विनायक सावरकर, तर चौथ्या फोटोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. राम कदम यांच्या या ट्विटची चर्चा रंगू लागली आहे.
 
राम कदम यांच्या या ट्विटवर ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे. राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. पृथ्वीचा आकार ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, असं म्हणत अंधभक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor