मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (16:30 IST)

नाशिकमध्ये बुधवारपासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातला असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात नाशिकमध्ये 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 12 मे बुधवार पासून 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात येत आहे. 12 ते 22 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहे.
 
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मे रोजी दुपारी 12 वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर 22 मे रोजी दुपारी 12 वाजता लॉकडाउनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. नाशिक जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्यांना पास बंधनकारक असणार आहे.
 
जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला, दूध, किराणा दुकाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकल इमरजेंसी वगळता इतर कोणतेही कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल पंपावर देखील केवळ अत्यावश्यक वाहनांना इंधन मिळणार आहे.