रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (14:32 IST)

Nashik Unique love story of divyang people : नाशिकात दिव्यांग जोडप्याच्या लग्नाची चर्चा

Nashik Unique love story of divyang people : असं म्हणतात की  लग्नगाठ वरून बांधून येत असते.  जिद्द आणि चिकाटी असली की सारं काही मिळतं, असं म्हणतात. एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्यावर लग्न करून वैवाहिक बंधनात बांधणाऱ्या जोडप्यांबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे. मैत्रीचं रूपांतरण प्रेमात झाल्यावर घरच्या लोकांच्या  विरोधात पळून जाऊन लग्न केल्याच्या गोष्टी देखील घडल्या आहेत. पण दिव्यांग असून या जोडप्यानं एकमेकांना साथ देण्याचं वचन घेत लग्न केल्याची घटना नाशिकात घडली आहे. विशेष म्हणजे हे दोघे दिव्यांग आहेत आणि त्यांनी जमिनीवर सरपटत सप्तपदी पूर्ण करत एकमेकांना आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देत लग्नगाठ बांधली. या दिव्यांग असलेल्या जोडप्यांचा लग्नाची चर्चा नाशिकात होत आहे.

ही  गोष्ट आहे नाशिकात सिन्नर तालुक्यातील उजनीत राहणाऱ्या जालिंदर सापनार आणि पुण्याच्या खेड तालुक्यातील वापागाव येथे राहणारी सारिका रणपिसे ह्या जोडप्याची. हे दोघे ही  दिव्यांग असून दोघांच्या घरची परिस्थिती बेताची असून आई-वडील मोल मजुरी करतात. जालिंदरचे भाऊ देखील दिव्यांग असून चपलेचा आधाराने ते सरपट चालतात. सारिका आणि जालिंदर हे दोघे दिव्यांग असून त्यांना जन्मापासून चालता येत नाही. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना ग्रामीण अपंग केंद्र टाकळी ढोकळेश्वरमध्ये पाचवीपासून शिक्षणासाठी पाठवलं .तिथेच त्यांची आपसात मैत्री झाली. दोघेही दिव्यांग असल्यामुळे ते नेहमी एकमेकांना मदत करायचे. नंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतरण प्रेमात झालं. लहानपणा पासून ते एकमेकांचे चांगले मित्र होते. एकमेकांची काळजी घेत असे. नंतर त्यांनी बारावी झाल्यानंतर लग्न करण्याचं ठरवलं. हे काही सोपं नव्हत. त्यात दोघांचे वय कमी जालिंदर 22 वर्षांचा तर सारिका 18 वर्षांची होती.
 
आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न करू असा त्यांचा निश्चय होता. लग्न करण्यासाठी घरच्यांची परवानगी घेण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्या बिकट परिस्थितीमध्ये सारिकानं पुढाकार घेतला.तीन तिच्या आईवडिलांना ‘मला जालिंदरसोबत लग्न करायचं आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखते. आम्ही दोघं एका वर्गात होतो. जालिंदरही माझ्यासारखाच आहे. त्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे,’ असं सांगितलं. सारिकाच्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध होता. त्यांनी सारिकाला शिक्षण बंद करण्याचा इशारा दिला.एकिकडं कुटुंबीयांचा विरोध तर दुसरी कडे जालिंदरच प्रेम. अशा परिस्थितीत देखील जालिंदरने तिला आधार दिला आणि साथ दिली. त्या मुले त्यांनी सारिकाच्या आईवडिलांचा विरोध पत्कारून लग्न करण्याचे निश्चित केले. 
 
जे होईल ते होईल, आपण आता एकमेंकाशिवाय राहू शकत नाही’  याची दोघांनाही जाणीव झाली होती. त्या दोघांनी 30 जून रोजी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर घरच्यांच्या इच्छेनुसार 18 जुलै रोजी उजनी गावात त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. सारिकाचे आई-वडिल या लग्नाला उपस्थित नव्हते. पण, जालिंदरच्या कुटुंबीयांनी लग्नाला हजेरी लावत नव्या जोडप्याला आशिर्वाद दिले.जमिनीवर सरपटत त्यांनी सप्तपदी पूर्ण केली.