रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:21 IST)

बच्चू कडू आणि भाजप समर्थक रवी राणा वादावर अपक्ष आमदार नवनीत राणांची प्रतिक्रिया

navneet rana
बच्चू कडू आणि भाजप समर्थक रवी राणा यांच्यात सुरू असलेला वाद शमताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांनीही पहिली वेळ आहे म्हणून माफी देतो, असे सांगत हा वाद मिटल्याचे जाहीर केले. मात्र, पुन्हा एकदा दोघांमधील संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. यातच आता अपक्ष आमदार नवनीत राणा यांनी या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडलेली आहे. 
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना नवनीत राणा यांना रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर मला त्या विषयावर काही बोलायचे नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देते. मला माझे काम महत्त्वाचे आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत, ते ज्याप्रमाणे ते बोलतात, त्या प्रमाणे आम्ही करतो, असे नवनीत राणा यांनी नमूद केले. 
 
Edited by: Ratnadeep Ranshoor