Atul Subhash Case:अतुल सुभाषची पत्नी निकिता, सासू निशा सिंघानिया यांना बेंगळुरू कोर्टातून जामीन
गेल्या वर्ष 2024 मधील बहुचर्चित अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात बंगळुरू न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. वास्तविक, बेंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टाने आरोपी सिंघानिया कुटुंबाची याचिका स्वीकारत अतुल सुभाष यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया आणि पत्नीचा भाऊ अनुराग सिंघानिया यांना जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी 20 डिसेंबर 2024 रोजी तिघांनीही जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी अतुल सुभाष आणि यूपीच्या जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी निकिता सिंघानिया यांचा 2019 साली विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांपासून दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद निर्माण झाले होते. यानंतर दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारल्या होत्या. अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश रीटा कौशिक आणि तिच्या सासरच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी 24 पानांची सुसाईड नोट लिहिली होती आणि एक तासाहून अधिक काळचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. ज्यात त्याने लग्नानंतरचा ताण, कौटुंबिक समस्या आणि पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणारा छळ यांचा उल्लेख केला होता. एका एनजीओच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरही त्याने ही सुसाईड नोट शेअर केली होती.
सुभाषच्या आत्महत्येनंतर 14 डिसेंबरला त्यांची पत्नी निकिता सिंघानियाला गुरुग्राम, हरियाणातून आणि सासू निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. यानंतर तिघांनाही बेंगळुरू येथे आणण्यात आले, तेथे त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.आता त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
Edited By - Priya Dixit