1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (18:21 IST)

उपवासासाठी भगर खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांना विषबाधा,कुटुंब रुग्णालयात दाखल

आता सणासुदीला सुरुवात झाली आहे.आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली  आहे. राज्यात भाविकांसाठी मंदिर खोलण्यात आले आहे. घरोघरी घट स्थापना केली आहे. भाविक नवरात्रात देवीची उपासना करतात.उपास करतात. हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्राच्या प्रथम दिवशी  जालन्यात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 
 
जालन्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावात ही घटना घडली आहे. उपवास असल्यामुळे एका कुटुंबाने भगरीचे सेवन केले असताना त्यातून त्यांना विषबाधा झाली आणि एकाच कुटुंबातील 6 जणांना  रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 5 जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या मध्ये 3 महिला,2 पुरुष,आणि एका मुलीचा समावेश आहे.
 
आज नवरात्रीचा उपवास असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाने सकाळी भगर खालली  आणि नंतर त्यांना त्रास होऊ लागला. गावातील काही लोकांनी त्यांना त्वरितच रुग्णालयात दाखल केले.त्यात 5 जणांची प्रकृती स्थिर आहे.परंतु एका महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने तिला औरंगाबादातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. नेमकी त्यांना विषबाधा कशी काय झाली यावर प्रश्नचिन्हच आहे.भगरमधून त्यांना विषबाधा कशी झाली याचा तपास केला जात आहे.