गुरूवार, 12 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (09:40 IST)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ सोहळ्यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार

modi
Mumbai News: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटी सदस्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लगेचच फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदीही निवड झाली. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याशिवाय अजित पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता शपथविधी सोहळा सुरू होईल. कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या 1000 प्रमुख लाभार्थी महिलांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
 
तसेच या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 400 हून अधिक संतांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाला महायुतीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समारंभात 70 हून अधिक व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांच्या आगमनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik