रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (11:09 IST)

महाराष्ट्रातील बदलापूर प्रकरणाबाबत राहुल गांधींच वक्तव्य समोर आलं, म्हणाले....

बड़ी खबर, NTA ने रोकी NEET UG 2024 की काउंसलिग
कोलकात्यापासून महाराष्ट्रापर्यंत, मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत देशभरात खळबळ उडाली आहे. तसेच सर्वसामान्यांपासून डॉक्टरांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी लोकांचा संताप कमी होत नसतानाच महाराष्ट्रातील बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 
 
महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींसोबत घृणास्पद वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बदलापूरमध्ये प्रचंड निदर्शने झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी बदलापूरच्या या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली बदलापुरात दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पहिले पाऊल उचलले नाही तोपर्यंत जनता 'न्यायासाठी याचना' करत रस्त्यावर उतरली आहे. राहुल गांधींनी पुढे लिहिले की, आता एफआयआर नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?