रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019 (10:27 IST)

राज ठाकरे म्हणजे मनोरजंन - अमृता फडणवीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.  
 
वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना देशातील राजकीय नेत्यांविषयी मत विचारण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंबद्दल विचारले असता, त्यांनी राज ठाकरेंना मनोरंजन असं म्हटलं. तसेच, "असं म्हटल्यानं त्यांना राग तर येणार नाही ना?" असंही अमृता फडणवीसांनी विचारलं.
 
यावेळी अमृता फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही मत विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, "मोदी हे 'नये भारत के राष्ट्रपिता' आहेत." अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना दिलेल्या याच उपमेमुळं वादात अडकल्या होत्या.
 
तर शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 'मोठे भाऊ' असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.