शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 17 जुलै 2019 (09:58 IST)

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांचे निधन

दलित पॅंथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते राजा ढाले यांचे 16 जुलै रोजी सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी निधन झाले. राजा ढाले यांची अंत्ययात्रा आज बुधवार दि.17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी पूर्वेतील त्यांच्या निवासस्थानाहून सुरू होऊन दादर चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. राजा ढाले यांचे पार्थिव गोदरेज रुग्णालय येथे नेण्यात आले असल्याची माहिती त्यांची कन्या गाथा ढाले यांनी दिली आहे.
 
राजा ढाले हे भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मुंबई मतदारसंघातून उभे होते, पण निवडून आले नाहीत. 2004 साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.
 
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर आंबेडकर चळवळीत राजा ढाले यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.