सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (08:18 IST)

Rashmi Shukla रश्मी शुक्ला राज्याच्या पोलिस महासंचालक!

Rashmi Shukla State Director General of Police महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा पुढे आली. दरम्यान, पोलिस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले तर सध्याचे राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यदी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरणार आहेत.
 
रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे. सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधीच त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार असताना रश्मी शुक्ला या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आला होता.
 
याप्रकरणी शुक्ला यांच्याविरोधात मविआ सरकारच्या काळात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, रश्मी शुक्ला यांनी याप्रकरणी कोर्टात भूमिका मांडली होती. राजकीय हेतूने प्रेरित होवून आपले नाव या प्रकरणात गोवण्यात आल्याचे रश्मी शुक्ला यांनी कोर्टात सांगितले होते. त्यानंतर कोर्टाने त्यांच्यावरील दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते.