सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (08:20 IST)

राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा रवी राणा यांची मागणी

ravi rana
श्रद्धाने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी राज्यात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा आणावा, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
श्रद्धाचा खून अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणे, ते फ्रिजमध्ये ठेवणे आणि रोज एक एक जंगलात नेऊन फेकणे, हे सर्व धक्कादायक आहे. श्रद्धावर अत्यंत विक्रृतपणे अत्याचार करण्यात आले आहे. या घटनेचा मी निषेध करतो. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आरोपीला थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ज्याप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी कायदा बनवण्यात आला आहे. त्या कायद्याच्या अंमलबजावणी महाराष्ट्रात केली पाहिजे. हा मुद्दा मी येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.
 
दरम्यान, श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही नार्को टेस्टला मान्यता दिली आहे. आफताबनेही नार्को टेस्ट करण्यास संमती दिली. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor