रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2017 (17:03 IST)

दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परत 18 जुलैला परिक्षा

दहावीच्या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परत परिक्षा घेतली जाणार आहे. यासाठी सोमवार दि. 19 जुन पाासून पुन्हा अर्ज करता येणार असून, 18 जुलैला त्यांची परिक्षा होणार आहे. त्याचा निकाल लगेचच ऑगस्टमध्ये लागून त्यांना याच वर्षी अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा परिक्षेसाठी अर्ज करणे अत्यावश्यक आहे. जे विद्यार्थी एक ते दोन विषयात अनुत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळत असला तरी त्यांना परिक्षा देवून ते विषय उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यामुळे एटीकेटीसह अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा एक समर्थ पर्याय आहे. याशिवाय उत्तरपत्रिका पुर्नतपासणी, झेरॉक्स उत्तरपत्रिकांची मागणी हे पर्यायही खुले असल्याने त्यासाठी देखील विद्यार्थी तातडीने अर्ज करू शकतात. केवळ अनुत्तीर्ण नव्हे तर सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेेंतर्गत परिक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मार्च 2017 मध्ये परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्व विषयासह प्रविष्ठ होवून जुर्ल 2017 व मार्च 2018 अशा दोन संधी उपलब्ध राहणार आहेत

.