शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 11 जून 2017 (09:59 IST)

पंढरपुर : पोहोण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू

पंढरपुरामध्ये  चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.  सुट्टीचे  दिवस असल्याने पंढरपूर शहरातील चार लहान मुलं चंद्रभागा नदीवरील घाटाजवळ पाण्यात पोहोण्यसाठी गेले होते.   पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली. मृत पावलेली ही मुलं वयोवर्षे 6 ते 8 या गटातील होती. यात धीरज अप्पा जुमाळे (८),  श्रीपाद सुनील शहापुरकार(६), गणेश सिद्धप्पा जुमाळे(८), आणि सौरभ अनिल शहापुरकार(६)अशी मुलांची नावे आहेत.