सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (09:30 IST)

Road Accident :महिला बाइक रायडरचा रस्ते अपघातात दुर्देवी अंत

सातारा येथून माहूरला रेणूकामातेच्या दर्शनासाठी जात असलेल्या हिरकणी बाईक राईड ग्रुपच्या शुभांगी संभाजी पवार (३२) यांचा भोकरफाटा येथे टँकरच्या चाकाखाली येऊन अपघात झाला. या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१२) सकाळी १० च्या सुमारास घडली.शुभांगी या सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक राईड करत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या.
 
डोक्यावरुन टँकर गेल्याने मृत्यू
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी एक हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन आदीशक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी मोटरसायकलवर निघाल्या होत्या. त्यांनी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले आणि त्या तुळजापूर पोहोचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूरगडात रेणुकामातेच्या दर्शनासाठी जात असताना भोकरफाटा दाभड येथे शुभांगी पवार यांची मोटारसायकल क्रमांक (एम.एच.११ सी.ए.१४४७) घसरली. त्याच वेळी पाठिमागून आलेला टँकर क्रमांक (जि.जे.१२ ए. टी. ६९५७) च्या खाली त्याची वाहन येऊन पाठीमागील चाकाखाली चेंगरुन शुभांगी यांचा जागीच दुर्देवी  मृत्यू झाला. विशेष म्हणजे डोक्यावर असलेले हेल्मेट शरीरापासून वेगळे पडले होते.