मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा ‘शॅडो’ वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच, सामन्यातून टीका

महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विऱोधी पक्षाची स्थिती पाहता शॅडो कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे हा खेळ सावल्यांचा नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत विऱोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही असा उल्लेख करतानाच आजच्या सामनाच्या अग्रलेखात मनसेच्या माध्यमातून भाजपलाही टार्गेट करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शॅडोची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करून नका. हे बरे झाले. पुन्हा ‘शॅडो’ वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा शॅडो राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे खेळ सावल्यांचा अधिक रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसल अशी टीका सामनाच्या संपादकीयच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
 
भाजप विऱोधी पक्ष झाला तरी अद्यापही सत्ताधाऱी असल्याच्या तोऱ्यात वागत आहे. हे जरा गमतीचे वाटते. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळावर नजर ठेवण्यासाठी एक शॅडो कॅबिनेट एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे शॅडो मंत्रीमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले तर अभिनंदन करावे असे सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे शॅडो कॅबिनेट कुणी करावे याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. तिथे भाजप हा एक विरोधी पक्ष आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने शॅडो मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो की काय ते बनवले.