गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (15:03 IST)

हरियाणा निवडणुकीतील निकाला बाबत संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर कऱण्यात आले. निवडणुकात भाजपला बहुमत मिळाले असून सलग तिसऱ्यांदा भाजपची सरकार बनत आहे. या निकालाबाबत शिवसेने उबाठाचे नेते संजय राऊतांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले हरियाणात काँग्रेसचा पराभव दुर्देवी आहे. काँग्रेसने पराभवाचे आत्मनिरीक्षण करावे.काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका करू नये. 

या हरियाणा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्र विधानसभावर कोणताही परिणाम होणार नाही. 
खरं तर काँग्रेस पक्षाला हरियाणात स्वबळावर निवडणूक लढवून जिंकू असे वाटले होते. तिथे 
इंडिया युती बनली नाही. बनली असती तर त्याचा फायदा निवडणुकीत झाला असता.पण ते सत्तेत कोणालाही भागीदारी देणार नसल्याचा विचार करण्याच्या करून एकट्याने निवडणूक लढवली.आणि पराभवाला सामोरी जावे लागले. 
महाराष्ट्रात देखील काँग्रेस पक्षाला स्वबळावर निवडणूक लढवायची असे तसे त्यांनी सांगावे.
भाजपने हरियाणात हारलेली बाजी जिंकली आहे. सामना कसा जिंकायचा हे भाजपने दाखवून दिले आहे. भाजपने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली ते कौतुकास्पद आहे.जम्मू काश्मीर मध्ये मात्र कलम 370 हटवल्यावर देखील भाजपला पराभवाला सामोरी जावे लागले.
Edited By - Priya Dixit