पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मानवी' वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पॉडकास्ट दरम्यान केलेल्या टिप्पणीबद्दल की ते माणूस आहे आणि त्यांच्याकडून देखील चुका होतात. या वर शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी संतापून प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी मोदींच्या वक्तव्याला प्रतिक्रिया देत म्हटले की मोदी तर देव आहे मी त्यांना माणूस मानतच नाही. देव म्हणजे देव. जर एकजाद्याने स्वतःला अवतार म्हणून घोषित केले असेल तर तो माणूस कसा काय असू शकतो. ते तर विष्णूंचा 13 व अवतार आहे. ज्याला देव मानतात तो स्वतःला माणूस म्हणत असेल तर काहीतरी केमिकल गडबडी आहे.
संजय राऊतांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपला पक्ष एकट्याने लढवणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबई, ठाणे, नागपूर आणि इतर महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू. असे ते म्हणाले.
Edited By - Priya Dixit