सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (15:07 IST)

संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली

balasaheb thackeray sister
थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजिवनी करंदीकर यांचं आज (13 मे) पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या व किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत्या. 
 
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व बॅंक ऑफ इंडियामध्ये 38 वर्षे मशीन सेक्शन अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं होतं.