शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (11:30 IST)

ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल- पंकजा मुंडे

"ओबीसींचं आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका," असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
 
त्याचबरोबर मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. लातूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मोठ्या संख्येनं भाजपचे नेते उपस्थित होते.

"ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय…आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलावू शकतो.आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल.ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे," अशा शब्दांत पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलीही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलीही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.