शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जानेवारी 2017 (09:07 IST)

युती तुटल्याचे अतीव दु:ख झाले - शरद पवार

'२५ वर्ष एकत्र काम करणाऱ्यांची युती तुटली याचं मला अतीव दु:ख वाटतं.’ अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. मात्र सदरची  प्रतिक्रिया देताना पवारांना त्यांच्या चेहऱ्यावरचं सूचक हास्य लपवता आलेले नाही. पुढे जर शिवसेना राज्यातील सत्तेतून बाहेर पडली तर तुम्ही पाठिंबा देणार का?  यावर बोलतांना पवार म्हणाले की, ‘आधी त्यांनी निर्णय घ्यावा आणि मग आमच्याशी चर्चेला यावं’असे स्पष्ट केले.