1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:19 IST)

शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का झाली नाही? नारायण राणेंचा सवाल..

sharad pawar
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या काळात राज्यात औद्योगिक क्रांती का झाली नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, "विरोधकांना कामधंदा काय आहे, त्यांनी अडीच वर्षे मातोश्रीवर राहूनच सरकार चालवलं, सगळ्या तडजोडी केल्या. त्यामुळेच हे उद्योग गेले आहेत."
 
"त्यांनी बढाया मारू नयेत. आम्ही राज्य सांभाळण्यास तसंच औद्योगिक प्रगती करण्यास समर्थ आहोत," असंही राणे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.