गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (18:51 IST)

जाचक अटींमुळे शिवभोजन केंद्र बंद होण्याच्या मार्गावर

shivbhojan thali
शिवभोजन ही शासनाची अंगिकृत व्यवस्था असंख्य गोरगरीब जनतेस संकटाच्या काळात मोठा आधार होती. मात्र, गेल्या काही काळापासून या योजनेत आणण्यात आलेल्या जाचक अटींमुळे ही योजना बंद होते की काय, असे वाटू लागले आहे. जवळजवळ गेल्या २ वर्षांपासून ह्या योजनांमध्ये शासन जाचक अटी घालून केंद्र चालकांस नाहक त्रास दिला जात असल्याच्या वाढत्या तक्रारी जिल्ह्यातून येऊ लागल्या आहेत.
 
शिवभोजन ही शासनाची योजना अत्यंत चांगली आणि सेवाभावी योजना आहे. या योजनेची सुरुवात होताच कोरोना महामारीने सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात असंख्य हाल सोसावे लागले. या संकटात शिवभोजन योजनेने सामान्यांना हात दिला. मात्र, कोरोना संकट सुरू झाल्यापासून गेल्या २ वर्षांपासून ह्या योजनेत असंख्य जाचक अटी घालण्यात आल्या असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत.