बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (08:07 IST)

‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’,‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’

balasaheb thackeray
‘शिवसेना’या नावासह ‘धनुष्यबाण’हे चिन्हंही गोठवण्याचा हंगामी निर्णय शनिवारी दिला. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हा निर्णय लागू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी माहिती दिली आहे.
 
उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, “त्रिशुळ, मशाल आणि उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्याचसोबत ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’,‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’अशी तीन नावेही निवडणूक आयोगाला सुचवण्यात आली आहेत,”असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
Edited by : Ratnadeep Ranshoor