शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 सप्टेंबर 2021 (08:08 IST)

धक्कादायक !राज्यात अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार, गर्भवती मुलीने केली आत्महत्या; आरोपीला अटक

महाराष्ट्रातील 34 वर्षीय महिलेवरझालेली क्रूरता आणि नंतर तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.आता राज्यातीलच अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी परिसरातील पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे की, शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली.एका तरुणाने 15 वर्षांच्या मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा दावा करण्यात आला होता. मुलगी देखील गर्भवती झाली होती. 
 
पोलिसांनी सांगितले, 'आम्हाला एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार केल्याची तक्रार मिळाली होती. ती गर्भवती झाली आणि नंतर तिने गळफास लावला.आरोपीला अटक करण्यात आली आहे.न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.