धक्कादायक! एसपीयू जवानाची गोळी झाडून आत्महत्या
नागपुरातील एसपीयू जवानाने कोरोना नंतर ब्लॅक फंगसमुळे आपला डोळा गमावला त्या नैराश्यात येऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
ही हृदय विदारक घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास नागपुरातील झिंगाबाई टाकळातील निवारा नावाच्या हौसिंग सोसायटी मध्ये घडली असून प्रमोद शंकरराव मेरगूवार असे मयत चे नाव आहे.
प्रमोद हे मूळ ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत असून प्रतिनियुक्तीवर एसपीयू मध्ये सामील झाले.त्यांना कोरोनाची लागण झाली होती.नंतर त्यातून ते बरे झाले आणि त्यांना ब्लॅक फंगस झाला त्यामुळे त्यांना डोळ्याला त्रास होऊ लागला.सुरुवातीस त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबाद पाठविण्यात आले.या उपचारा दरम्यान त्यांचा एक डोळा निकामी झाला.त्यामुळे ते तणावाखाली गेले.याच दरम्यान त्यांच्या दुसऱ्या डोळ्याला देखील त्रास होत होता. वेदना असह्य झाल्यामुळे आणि तणावाखाली येऊन त्यांनी आज दुपारी स्वतःवर बंदुकाने गोळी झाडून आत्महत्या करून आपले जीवन संपविले.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
घटने ची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविले.पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास सुरु आहे.