1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (11:17 IST)

धक्कादायक ! कर्णबधिर आजी समोरच तिन्ही मुलं बुडाली,मृतदेहाचा शोध सुरूच

दोन दिवसापूर्वी फुलंब्री तालुक्यातील वानेगावात गिरीजा नदीत तीन मुलंवाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली होती.त्यात दोघे सक्खे भावंडं होते.अग्निशमन दलाच्या पथकातील जवानांनी तिन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केले असता त्यांना दोघं  मुलांची मृतदेह सापडली .परंतु अद्याप एकाचा मृतदेह सापडलेला नाही.मुलाचा मृतदेह नदीपात्रात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुलाची आजी मुक्ताबाई रामराव शेजवळ रा.वानेगाव आपल्या नातू आणि त्याच्या दोन मित्रासह  गिरीजा नदीवर कपडे धुण्यासाठी आली  होती . आजी कर्णबधिर आहे त्या कपडे धूत होत्या आणि त्यांचा नातू निलेश आणि त्याचे दोन मित्र नदीपात्राच्या पाण्यात खेळू लागले.तेवढ्यात नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आणि ते तिघे पाण्यात बुडाली.आजी कर्णबधिर असल्यामुळे मुलांचा ओरडण्याचा आवाज तिचा पर्यंत पोहोचलाच नाही.आणि ते तिघे मुलं पाण्यात बुडून मरण पावले.आजी ला समजेल तो पर्यंत उशीर झाला होता. आजीने मदतीसाठी धाव घेतली गावकरींनी मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाती अपयश आले.
 
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी मुलांचा शोध नदीपात्रात घेण्याचा प्रयत्न केला. बराच वेळा नंतर त्यांच्या हाती दोघांचे मृतदेह लागले.पण अद्याप एकाचा मृतदेह हाती लागलेला नाही.मुलाचा मृतदेह नदीपात्रात वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघांचा मृतदेह बघतातच कुटुंबांनी हंबरडा फोडला.तिसऱ्या मुलांचा मृतदेहाचा शोध मोहीम अद्याप सुरु आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.