रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (16:26 IST)

सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न : दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राठोड यांना सत्ता, खुर्ची प्रिय असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. सत्ता आणि खुर्ची असेल, तरच आपण या प्रकरणातून वाचू शकतो. मीडियासमोर येऊन संजय राठोड यांनी नाटक केले. ती आत्महत्या आहे की हत्या आहे किंवा मृत्यूचे कारण काय याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 
 
संजय राठोड यांनी महाराष्ट्राचे मन दुखावले आहे. संजय राठोड म्हणतात की ते १० दिवस काम करत होते. मात्र, मंत्रीमंडळ बैठका तर झालेल्या दिसल्या नाही. केवळ सत्य लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न संजय राठोड करत आहेत, असा दावा प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री सामाजिक दबावाला बळी पडताहेत की काय, अशी शंका यामुळे निर्माण होत आहे, असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.