शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (18:43 IST)

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षांची केली अधिकृत घोषणा

राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेतल्या जाणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. इयत्ता बारावीची बोर्डाची लेखी परीक्षा ही 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे. तर दहावी बोर्डाची परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे. दरम्यान या सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून देहात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या [परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना विशेष मूल्यांकन पद्धतीनं मार्क्स देण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. दहावी आणि बारावीचे प्रत्यक्ष वर्गी सुरु झाले आहेत. म्हणूनच आता राज्यात या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारवेच्या परीक्षांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे.
या दरम्यान होणार तोंडी परीक्षा (Oral exam) 
दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीच्या तोंडी परीक्षा कधी होणार आहेत याबद्दलही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
इयत्ता बारावीच्या तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 दरम्यान होणार आहे.
तर इयत्ता दहावीच्या तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022 दरम्यान घेण्यात येणार आहेत.