शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 मार्च 2024 (10:58 IST)

असं कधी कोण कोणाला तडीपार करत नाहीत. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलंय का?

devendra fadnavis
मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्रीसाहेब स्वप्न बघायचे कमी करा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. जरांगेंच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘असं कधी कोण कोणाला तडीपार करत नाहीत. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलंय का? तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर काही केसेस आहेत का? असंही काही नाही’, असे म्हणत फडणवीसांनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर दिले.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीदरम्यान माध्यमांशी संवाद साधतना देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले. “आमचे खूप हितचिंतक आहेत. ते हितचिंतक जरांगे पाटलांना जाऊन काहीना काही सांगत असतात. त्यावर ते कदाचित बोलतात. पण असं कधी कोण कोणाला तडीपार करत नाहीत. तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलंय का? तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर काही केसेस आहेत का? असंही काही नाही. अनेक लोकं वाहत्या गंगेत हात धुवून घ्या, त्यापद्धतीने त्यांना जाऊन काहीना काही सांगत बसतात”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Edited By -Ratnadeep Ranshoor