गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (15:08 IST)

कोरडवाहू जमिनीत करून दाखवली सफरचंदाची यशस्वी शेती

वाशिम :-- शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधी शेती मालाला बाजारात भावाची कमतरता तर कधी बदलत्या वातावरणाचा पिक उत्पन्नावर होणारा परिणाम.
 
यामुळे शेती व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांच्या हाती निराशा येते. पण शेती व्यवसयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यावर काय होऊ शकते हे वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील चहल गावच्या शेतकऱ्याने करून दाखवून दिलं आहे.
 
प्रवीण ठाकरे या शेतकऱ्यांने नवा प्रयोग म्हणून आपल्या कोरडवाहू जमिनीत सफरचंदाचीही लागवड केली आसून आता एप्रिलच्या या कडक उन्हात त्याच्या बागेतील सफरचंदाची फळधारणा होत आहे.
विदर्भ तसा दुष्काळी भाग, सध्या रखरखत्या उन्हामध्ये शेताकडेही कुणी फिरकत नाही. पण चहल गावच्या ठाकरे यांची 35 एकरात अशी शेती आहे. की जिथे गेल्यावर या शेतातून तुमचा पायही बाहेर निघणार नाही.
त्यांनी त्यांच्या शेतात विविध फळबागा फुलवल्या आहेत. त्यात त्यांनी बारमाही येणारा आंबा, संत्रा,सीताफळा, कमी उंचीचे नारळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, टरबूज अशी फळपीकांची लागवड करून त्या पासून उत्पादन घेत आहे.
दोन वर्षापूर्वी ठाकरे यांनी सफरचंदाचीही लागवड केली आहे.शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसयात त्यांनी अमूलाग्र बदल केला आहे.त्यांची शेती ही कोरडवाहू भागातलीच शेती आहे. त्यांच्या शेतीजवळ ना कोणते धरणं आहे. ना कोणती मोठी नदी. मात्र उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व उत्तम नियोजण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी आपली 35 एकर शेती हिरवीगार केलीय.
पिकाला पाणी देण्यासाठी सम्पूर्ण ऑटोमेशन सिस्टीम बसवली आहे.ज्यामुळे बागेला हवं तेव्हडच पाणी, योग्य वेळी, मेंटेन करून दिलं जातं, याच नियोजनाद्वारे फळझाडांना खतंही दिली जातात. ज्यामुळे पाणी, खत आणि वेळीचीही बचत होत आहे.,