मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018 (16:20 IST)

आत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या

नागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. महिन्याभरापूर्वी त्याच्यासमोर एक अपघात घडला होता. त्यात एका मुलाचा तडफडत मृत्यू झाल्याचे सौरभने बघितले होते. या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाला होता. त्या मुलाचा आत्मा आपल्याला बोलवत आहे. म्हणूनच मी आत्महत्या करत असल्याचे सौरभने आत्महत्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. 
 
महिन्यापूर्वी झालेल्या त्या अपघाताच्या घटनेबद्दल सौरभने घरातल्यांनाही सांगितले होते. या अपघातात मुलाबरोबर एक महिलाही होती, असेही त्याने सांगितले होते. पण त्या घटनेनंतर सौरभ अस्वस्थ झाला होता. त्याला चित्र विचित्र आवाज ऐकू येत होते. मुलाचा आत्मा सतत आपला पाठलाग करत आहे, बोलवत आहे, असं सौरभला सतत वाटायचं म्हणून तो हादरला होता. त्यानंतर त्यांनं हा मार्ग स्वीकारला असे त्यांच्या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे.