शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (09:04 IST)

नरेंद्र मोदींच्या वागण्यामुळे नाराज नव्हे, तर हैराण झालीय - सुप्रिया सुळे

supriya sule
"पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक सामान्यांना अपेक्षित आहे. पण सध्या ते सदासर्वकाळ राजकारण्यासारखे वागत आहेत. त्यांच्या वागण्यामुळे मी नाराज नव्हे तर हैराण झाले आहे," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
 
पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलवरून मोदींनी घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
"ही गोष्ट निश्चितच खटकणारी आहे. त्याबाबत मी लोकसभेत व त्यांना वैयक्तिक भेटल्यानंतरही सांगितलं आहे," असं सुळे यांनी म्हटलं.