रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2022 (08:56 IST)

सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन ' असा नवस तुळजा भवानीला केला

supriya sule
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या तोंडून बाहेर आला. सुप्रिया सुळे यांनी नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. या दौर्‍याचा शेवट त्यांनी रविवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन केला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन, असा नवस देवीकडे केल्याचे सांगताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.
 
राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. राज्यात दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यास संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
 
सोबतच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावे की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळे महाराष्ट्रातील लोक ठरवतील, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच राज्यात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, असे साकडे तुळजाभवानीकडे घातल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.