रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 जानेवारी 2023 (08:38 IST)

शिक्षकाचे बस मध्येच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

death
मूळचे परभणी जिल्ह्यातील आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरमळे देऊळ प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले हरिभाऊ रामभाऊ घोगरे (५३) हे शिक्षक गावाकडून येत असताना गोवा कदंबा बस मध्येच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याची दुर्दैवी घटना कणकवली तालुक्यातील फोंडा दरम्यान घडली.
 
हरिभाऊ घोगरे सरमळे शाळेत तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी डेगवे मोयझर शाळेत त्यांनी सेवा बजावली. सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस सुट्टी घेऊन ते शनिवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कान्हा या आपल्या गावी गेले होते. आपल्या गावाकडून ते मंगळवारी रात्री कोल्हापूरपर्यंत आल्यानंतर ते बुधवारी सकाळी मिरज – पणजी या कदंबा गाडीने येत होते. ही बस फोंड्यादरम्यान आली असता हरिभाऊ घोगरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तात्काळ त्यांना फोंडा प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
 
Edited by :  Ratnadeep Ranshoor