शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (10:40 IST)

ठाकरे सरकारचे खातेवाटप तात्पुरते - जयंत पाटील

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं. त्यात गृह, नगर विकास हे सेनेकडे, महसूल, सार्वजनिक बांधकाम काँग्रेसकडे, तर वित्त, गृहनिर्माण राष्ट्रवादीकडे देण्यात आलंय. मात्र, हे खातेवाटप तात्पुरते असल्याचं मत राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय.
 
"माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल," असं जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
 
येत्या 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी ठाकरे सरकारचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या शपथविधीनंतर गेल्या 15 दिवसांपासून सरकारमधील सर्वच मंत्री मंत्री बिनखात्याचे होते.