बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 मे 2022 (09:03 IST)

पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी ठाकरे सरकारच जबाबदार - बबनराव लोणीकर

uddhav thackeray
"पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसाठी राज्यातील महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे," अशी टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
 
ते म्हणाले, "जनतेच्या हिताची कोणतीच योजना आणण्यात आणि अंमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे.
 
"पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचं सरकार ठरलं."
 
"केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ 19 रुपये असताना ठाकरे सरकार 30 रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबडत आहे," असं लोणीकर म्हणाले.