शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (13:07 IST)

ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी ', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आज महत्त्वाची घोषणा

सलग दोन वर्ष कोरोनाने उच्छाद मंडळ होता. त्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लावावा लागला .या कोरोनामुळे बऱ्याच लोकांनी आपली माणसे गमावली आहे. काही काही राज्यात कोरोनाची प्रकरणे वाढली आहे. त्या राज्यात कोरोनाबाधित क्षेत्रात पुन्हा लॉक डाऊन लावण्यात आले आहे. यंदा च्या वर्षी देखील कोरोना चा प्रभाव दिसला. आता कोरोनाची लाट सरत आली असून आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी राज्य सरकार ने कोरोना निर्बंध लावले आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाप्रमाणे दिवाळीसाठी देखील काही योजना आखल्या जात आहे. कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, मंदिरे हॉटेल्स, नाट्यगृहे , चित्रपट गृहे उघडण्यात आली आहे. त्यासाठी काही नियमावली जाहीर केली आहे. आता दिवाळीचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन टिपला आहे. त्यासाठी देखील राज्य सरकार काही निर्णय घेऊन काही महत्त्वाची घोषणा करणार आहे.या साठी त्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. दिवाळी हा मोठा सण असून आता सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या साठी राज्य सरकार काही उपाय योजना योजित आहे. कोरोनाचा आढावा घेऊन दिवाळीसाठी काही घोषणा आज मुख्यमंत्री करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोक आता बाजारपेठेत गर्दी करत आहे. कोरोनाप्रकरणाची संख्या वाढू नये याचा आढावा घेऊन काही निर्णय घेण्यात येतील .त्यासाठी आज मुख्यमंत्री यांनी विशेष बैठक बोलावली आहे आणि आज ते दिवाळीसाठी काही महत्त्वाची घोषणा करू शकतात.