सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (08:12 IST)

वाहून गेलेल्या गणेश भक्ताचा मृतदेह आठ दिवसांनी सापडला

death
कर्जत तालुक्यातील चांदई येथील उल्हास नदीवर गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या उकरून येथील गणेश भक्ताचा मृतदेह आज 5ऑक्टोबर रोजी आठव्या दिवशी सापडला. उल्हास नदी मध्ये धामोते येथील धनेश्र्वरी मंदिराच्या मागे आढळून आले. गणेश भक्त चेतन सोनवणे असे त्याचे नाव आहे.
 
उकरूल येथील मॅपल सोसायटी मध्ये राहणारे चेतन सोनवणे यांचा आणि त्यांच्यासोबत असलेले तिघे 28 सप्टेंबर रोजी उल्हास नदी येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता वाहून गेले होते.त्यातील एक गणेश भक्त रोहित रंजन हा स्वतः पोहून बाहेर आला होता. तर त्यावेळी चेतन सोनवणे तसेच त्यांचे मित्र जगदीश साहू आणि यश जगदीश साहू हे तिघे उल्हास नदीत वाहून गेले होते. अपघातग्रस्त मदतीसाठी आणि कोलाड रेस्क्यू टीम कडून दोघांचे मृत्यदह आढळून आले होते.
 
चेतन सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला नव्हता,त्यामुळे तिसर्‍या दिवशी कर्जत पोलीस आणि प्रशासनाने शोध मोहीम थांबवली होती. आज 5 ऑक्टोबर रोजी घटनेनंतर आठव्या दिवशी उल्हास नदी मध्ये धामोते गावाच्या हद्दीत धनेश्वरी मंदिरच मागे मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी कोल्हारे, सामोरे नळपाणी योजनेचे काम सुरू असून तेथील कामगारांना त्या मृतदेहाबद्दल माहिती मिळाली त्यांनी नेरळ पोलीस यांना कळविण्यात आली.
 
नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे,उप निरीक्षक दहातोंडे,किसवे, सरगर आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने खोपोली येथील गुरुनाथ साठलेकर आणि त्यांचे सहकारी यांनी चेतन सोनवणे याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.