क्रेनचा गियर बॉक्स तुटल्याने अपघातात पती पत्नी ठार
कोपरगाव शहरातील मूर्षतपूर शिवारात विहिरीचे खोदकाम करताना क्रेनचा गिअरबॉक्स तुटल्याने मोठा अपघात झाला आणि या अपघातात दोन जण ठार झाले.
या अपघातात राजस्थान येथील जेठालाल जग्गूलाल भिल आणि त्यांची पत्नी शांती जेठालाल भिल ह्याचा दुर्देवी अंत झाला. कोपरगावात मूर्षतपूर येथे विहिरीचे खोदकाम सुरु होते. या कामात लागलेय क्रेनचा गिअर बॉक्स तुटल्याने मोठा अपघात झाला आणि त्यात दोघे ठार झाले. जेठालाल भिल आणि शांती जेठालाल भिल असे या मयताची नावे असून ते पती-पत्नी होते. हे भिल दाम्पत्य राजस्थानचे रहिवासी होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.