सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही : फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रावरुन आता राजकीय वाद सुरु झाला आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. रोज सकाळी ९ वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकंच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी ईडी कारवाईवरुन केलेल्या आरोपांनाही फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ईडी काय करेल हे ईडी सांगेल, ते का करतात हे देखील ईडी सांगेल, मला असं वाटतंय संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करतायत. मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जातं नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणं सोडून दिलं पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. दिवसभर आपण कसं चर्चेत राऊ यासाठी संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करतात, राऊत संपादक असल्याने हेडलाईन कशी द्यायची हे त्यांना माहित आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.