शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मार्च 2024 (12:25 IST)

मॅनेजरने तीन कोटी रुपयांचे सोने स्वतःच्या बँकतुन लुटले, आरोपी मॅनेजरला अटक

arrest
ऑनलाइन बेटिंगच्या नादात चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. आता भारतीय स्टेट बँकांच्या मॅनेजर ने स्वतःच्या बॅंकेतून तीन कोटी रुपयांचे सोने लुटल्याचा धक्कादायक प्रकार भांडुप पश्चिम मध्ये घडला आहे. या प्रकरणी आरोपी पर्सनल ब्रांचमध्ये काम करणाऱ्या सर्व्हिस मॅनेजरसह एकाला अटक केली आहे. 

सदर घटना मुलुंड -नाहूर येथे रुनवाल ग्रीन या ठिकाणी असलेल्या एसबीआय शाखेत अमित कुमार प्रशासक आहे तर आरोपी मनोज म्हस्के मॅनेजर आहे. 27 फेब्रुवारी रोजी मनोज म्हस्के हे रजेवर असताना प्रशासक अमित कुमार यांच्याकडे लॉकरची  जबाबदारी देण्यात आली होती.लॉकरच्या दोन चाब्या आहे.दोन्ही चाव्या वापरूनच लॉकर उघडता येणे शक्य होते. एक चावी सर्व्हिस मॅनेजरकडे, तर दुसरी शाखेत कॅश इनचार्ज म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे असते  अमित कुमार यांना लॉकर  मध्ये दागिने आणि रोख रक्कम जमा करताना त्यांना सोन्याच्या दागिन्यांची अनेक पाकिटे गायब दिसून आली. बॅंकेतील कागदपत्रे तपासली असताना त्यांना शाखेने 63 ग्राहकांना सोनं  तारण ठेवून कर्ज दिल्याचे आढळले. मात्र त्या ठिकाणी फक्त 4 पाकिटे शिल्लक होती. 63 पैकी 59 पाकिटे गहाळ झाली होती  59 पाकिटे गहाळ असल्यामुळे अमित कुमार यांनी ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुट्टीवर असलेल्या सर्व्हिस मॅनेजर मनोज म्हस्के यांना तातडीने बँकत बोलावून घेतले आणि  गहाळ झालेल्या सोन्याच्या पाकिटाबाबत विचारले. यावेळी मनोज म्हस्के याने सोन गायब केल्याची कबुली देत, गायब सोन्यापैकी काही सोने दुसरीकडे गहाण ठेवले तर काही सोने विकल्याची कबुली दिली.

तसेच गायब केलेले सोने लवकरच परत करतो, असे म्हणत त्याने बँकेकडे वेळ मागून घेतला. पण बँकेने त्याला कुठलाही वेळ न देता अमित कुमार यांनी भांडुप पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.पोलिसांनी म्हस्के यांची.चौकशी केल्यावर त्यांच्या सह फरीदशेख असे या आरोपीचे नाव समोर आले. हा सोन विकायला म्हस्के यांना मदत करत होता. ऑनलाईन बेटिंगच्या नादाला लागून म्हस्के याने चोरी केल्याचे समोर आले. आरोपी बँक मॅनेजर ला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे, 

 Edited by - Priya Dixit