गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 6 जून 2021 (10:03 IST)

राष्ट्रवादीनं मला साथ दिलीय, मग त्यांना का सोडू? - एकनाथ खडसे

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला साथ दिली. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मी राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही," असं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलंय.
"भारतीय जनता पक्षात काही लोकांनी माझा भरपूर छळ केला, माझ्यावर खोटे आरोपे लावून चौकशा लावल्या आणि त्यामुळे पक्ष सोडला," असंही खडसे म्हणाले.
भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोनच दिवसांपूर्वी जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमधील निवासस्थानी गेले होते. तिथे त्यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली होती.
 
यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आले होते. मात्र, स्वत: खडसेंनी यावर स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिलाय.