बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2023 (21:16 IST)

‘केरला स्टोरी’च्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहीजे : जितेंद्र आव्हाड

jitendra awhad
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून नाराजी व्यक्त करत चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच या चित्रपटाच्या नावाखाली केरळ राज्याची आणि तिथल्या महिलांची बदनामी सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
आपल्या ट्विटरवर लिहिताना ते म्हणाले “‘द केरळ स्टोरी’च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात येत आहे. अशा घटनांना बळी पडलेल्यांचा अधिकृत आकडा 3 असून तो या चित्रपटात 32, 000 इतका दाखवण्यात येत आहे. ज्या व्यक्तीने हा काल्पनिक चित्रपट तयार केला त्याला सार्वजनिक फाशी देण्यात यावी.” असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी “तुम्हाला महिला भगिणींची बदनामी करायची आहे का? आपल्या महिला भगिनी मूर्ख आहेत आणि त्यांना काहीही समजत नाही हे दाखवण्यासाठी आणि शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना गौण म्हणून दाखवण्यासाठी हा खटाटोप सुरु केला आहे. अशा प्रकारचे चित्रपट खोटेपणाच्या आधारे हिंसा, द्वेष पसरवून त्यातून निवडणुका जिंकता येतील या हिशोबाने बनवले जातात.” असेही ते म्हणाले
 
इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाकडून मुलींच्या सैन्यभरतीवर आधारीत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या सुदिप्तो सेन यांने देशभरात मोठे राजकीय वादळ उठवले. या चित्रपटाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळाला असून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यात हा चित्रपट करमुक्त केला गेला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor