महिलेने जी भुमिका घेतली ती नेत्याने घेतली नाही; शरद पवारांचा हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा
देशात सत्तेचा गैरवापर होत असून तरुणांना बिघडवल जात आहे. हे सगळं आपण बदलू. त्यासाठी मोदींच्या हातातून देशाची सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूरात आज एका जाहीर सभेत बोलत होते. तसेच कोल्हापूर ही शुरांची भूमी असून काही दिवसांपूर्वी ईडीची नोटीस आल्यावर काही जणांनी खंबिर भुमिका घ्यायला हवी होती. असे विधान करून शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.
कोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकात आज शरद पवार यांची सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार आज प्रथमच कोल्हापूरात आले. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या का जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टिका केली.
ते म्हणाले “आपण पाहीले आहे कि, सामनाचे संपादक राऊत यांना तुरुंगात टाकण्यात आलं, सडेतोड लिहीत राहणार म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांना देखील तुरुंगात टाकण्यात आलं. भाजपला वाटलं आम्ही या सगळ्यांना घाबरतो. मलाही ईडीची नोटीस आली होती. मी म्हटलं उद्या नाही आताच ईडीच्या ऑफिसला येतो. सगळे पोलीस अधिकारी घरात येऊन बसले आणि येऊ नका. असे प्रत्येकाने वागले पाहिजे.” असेही ते म्हणाले.
राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, “कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे, काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीच्या कारवाईला सामोरे जातील. त्यांच्या घरातील महिलेनेही सांगितलं की आम्हला गोळ्या घाल्या. पण त्या कुटुंबातील प्रामुख्याने तसं म्हटलेलं ऐकलं नाही. जी भूमिका त्या घरातील भगिनीने घेतली तीच भुमिक त्या प्रमुख नेत्याने घेतली नाही.” असे ही ते म्हणाले. तसेच देशात सत्तेचा गैरवापर होत असून वेगवेगऴ्या मार्गाने तरुणाईला बिघडवण्याचे काम सध्या चालू आहे. यावर आपण लवकरच बदल घडवू आणि भाजपला सत्तेबाहेर काढू असेही ते म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor