शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (09:41 IST)

पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळला

कोल्हापुरात एका पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या गावापासून दीड किलोमीटर अंतरावर मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या परिसरात एका लोखंडाच्या पत्र्याच्या पेटीत हा मृतदेह होता. या महिलेचा 7-8 दिवसांपूर्वी गळा आवळून खून केल्याची  शक्यता वर्तवली जात आहे. या महिलेचे वय 30-32 असण्याची शक्यता आहे.   
शाहूवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्दखून आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.